‘बाळगा देशाचा अभिमान, करा राष्ट्रध्वजाचा सन्मान’
By admin | Published: January 28, 2017 12:59 AM2017-01-28T00:59:56+5:302017-01-28T00:59:56+5:30
युवा मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्यात आला.
युवा मित्रांचा उपक्रम : राष्ट्रध्वजांचे संकलन करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुर्पूद
चंद्रपूर : युवा मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्यात आला. यात ‘बाळगा देशाचा अभिमान, करा राष्ट्रध्वजाचा सन्मान’ असा संदेश नागरिकांना देण्यात आला.
राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी कागदी अथवा प्लॉस्टीकच्या ध्वजाचा वापर न करता तिरंग्याची प्रतिकृती चेहऱ्यावर जलरंगांनी चित्रीत करुन राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त करत विद्यार्थी व नागरिकांत राष्ट्रध्वजाप्रती जागृती निर्माण करण्याचे कार्य युवा मित्रांकडून करण्यात आले. जटपुरा गेट येथे सकाळी ७.३० वाजता अभियानाला सुरूवात करण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह नागरिक व लहान मुले व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता कार्यक्रमस्थळावर पडलेल्या राष्ट्रध्वजांचे संकलन करुन ते सन्मानाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुर्पूद करण्याचे काम युवा मित्र मंडळाकडून करण्यात आले. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर तिरंग्याची प्रतिकृती काढली. या अभियानात महेश काहिलकर व मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)