एसडीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे समाधान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:52 PM2018-06-10T23:52:28+5:302018-06-10T23:52:42+5:30

येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

To be satisfied with the citizens coming to the SDO office | एसडीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे समाधान व्हावे

एसडीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे समाधान व्हावे

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, नगराध्यक्ष हरीष शर्मा, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पंचायत समिती सभापती गोंविदा पोडे, न. प. उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगर परिषदेच्या २६ सेवानिवृत्त कर्मचाºयांना त्यांच्या थकीत असलेल्या रकमेचे धनादेश, विधवा, परित्यक्ता महिला व पुरुषांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या वतीने डस्टबीन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसडीओ क्रांती डोंबे यांनी केले. संचालन जांभुळकर यांनी तर आभार अहीर यांनी मानले.
पालकमंत्र्यांमुळे विकास कामे मार्गी : ना. अहीर
देशात व राज्यात भाजप सरकार आले तेव्हापासून सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे विविध विकास प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने कार्यान्वित होत आहेत. याचा आपल्याला या क्षेत्राचा खासदार म्हणून अभिमान असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: To be satisfied with the citizens coming to the SDO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.