बल्लारपुरात अस्वल शिरल्याने खळबळ; बेशुद्ध करून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:37 AM2019-10-10T10:37:09+5:302019-10-10T10:37:35+5:30

शहरातील गुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात आलेल्या अस्वलाला वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करून जेरबंद केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

A bear entered Ballapur; handover to Forest department | बल्लारपुरात अस्वल शिरल्याने खळबळ; बेशुद्ध करून जेरबंद

बल्लारपुरात अस्वल शिरल्याने खळबळ; बेशुद्ध करून जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देवन विभागाने सोडले सुरक्षित जंगलात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील गुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात आलेल्या अस्वलाला वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करून जेरबंद केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
गुुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात अस्वल शिरल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना मिळाली. अस्वलाला बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना बाजूला करून अस्वल दडून असलेल्या झुडुपाच्या सभोवताल जाळी लावून सुरक्षित केले. दरम्यान हे अस्वल एका पडक्या घरावरही चढले होते. रॅपिड रिस्पॉन्स टिमला पाचारण केले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी सदर अस्वलावर डॉट मारून बेशुद्ध करण्याची कार्यवाही सुरू केली. अथक परिश्रमानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास पथकाला यश मिळाले. त्यानंतर अस्वलाला पिंजऱ्यात जेरबंद करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यावेळी वन विभागाचे भोवरे, विरूटकर, कांबळे, सुखसे, टेकाम आदी उपस्थितीत होते. गावात वन्यप्राणी शिरल्यास नजिकच्या वनाधिकाऱ्यांनी तात्काळ माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांनी केले.

Web Title: A bear entered Ballapur; handover to Forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.