अस्वलाचा चंद्रपूर शहरात तब्बल सात तास मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 07:47 PM2020-05-02T19:47:37+5:302020-05-02T19:50:50+5:30

चंद्रपूर शहरात एक अस्वल शनिवारी पहाटे २ वाजतापासून मुक्तसंचार करीत होती. या अस्वलाला तब्बल सात तासांनी म्हणजेच सकाळी सुमारे ८ वाजता बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

A Bear roaming for seven hours in Chandrapur city | अस्वलाचा चंद्रपूर शहरात तब्बल सात तास मुक्तसंचार

अस्वलाचा चंद्रपूर शहरात तब्बल सात तास मुक्तसंचार

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाने बेशुद्ध करून केले जेरबंद तात्पूरते उपचार केंद्रामध्ये हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात एक अस्वल शनिवारी पहाटे २ वाजतापासून मुक्तसंचार करीत होती. या अस्वलाला तब्बल सात तासांनी म्हणजेच सकाळी सुमारे ८ वाजता बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. प्राथमिक तपासणी करून या अस्वलाला येथीलच तात्पूरते उपचार केंद्रामध्ये उपचारार्थ ठेवण्यात आले आहे.
पहाटे सुमारे २ वाजता एक अस्वल चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रेल्वे रुळाच्या मार्गाने चंद्रपूरातील संजय गांधी मार्केट परिसरात दाखल झाली. यानंतर ती जटपुरा गेटपर्यंत गेली. तेथून परतीचा मार्ग तिला गवसलाच नसल्याने तिची भटकंती सुरू झाली. येथून बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बंगाली कॉलनी परिसर, तेथून इंडस्ट्रीयल इस्टेट मार्गे आदर्श पेट्रोल पंप लगतच्या महावितरण सेंटर परिसरात गेली. नंतर शास्त्रीनगर मार्गे बंगाली कॅम्प परिसर, राधिका सभागृह असा प्रवास करीत असतानाच दिवस उजाळला. मात्र तीला तिचा मार्ग सापडला नाही. अखेर ती सीएचएल हॉस्पिटल लगतच्या बाजुला असलेल्या झुडुपात लपून बसली. दरम्यान, रॅपिड रिस्पॉन्स युनिटसह वनविभागाचे विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे, सहाय्यक वनसंरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर, इको-प्रोचे वन्यजीव संरक्षक दल, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, मिलिंद किटे व वनकर्मचारी ही मंडळी तिच्या मागावर होती. झुडुपात अस्वल दडून बसल्यामुळे मोठ्या शिताफीने तिला शुटर बेग यांनी बेशुद्ध करण्यात यश मिळविले. जरबंद करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडशेलवार यांनी तपासणी केल्यानंतर या अस्वलाला तात्पूरते उपचार केंद्रामध्ये हलविण्यात आले.

वीज केंद्र परिसरातील अस्वल
ही अस्वल वीज केंद्र परिसरात अनेक झाडे-झुडपे असून ताडोबाचा परिसरात जवळच आहे. या भागात अनेकदा वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन झालेले आहे. हे प्राणी वीज केंद्रातून येणाऱ्या रेल्वे रुळाच्या मार्गे चंद्रपूर शहरात येतात. यानंतर या प्राण्यांना परतीचा मार्गच गवसत नसल्यामुळे त्यांची भटकंती होते. यापर्वीही अनेकदा चंद्रपूरात अस्वलाचे दर्शन झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय गांधी मार्केट परिसरात असेच एक अस्वल आले होते. नंतर नागरिकांनी त्याला हुसकावले असता ते इरईनदीच्या दिशेने पळून गेले होते.

 

Web Title: A Bear roaming for seven hours in Chandrapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.