आयुध निर्माणी परिसरात अस्वलाचा फेरफटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:21+5:302021-05-31T04:21:21+5:30
फोटो सचिन सरपटवार भद्रावती : वन्यप्राणी पाहण्याची तशी सर्वांचीच आंतरिक इच्छा असते. मग तो कोणताही वन्यप्राणी असो. पण तो ...
फोटो
सचिन सरपटवार
भद्रावती : वन्यप्राणी पाहण्याची तशी सर्वांचीच आंतरिक इच्छा असते. मग तो कोणताही वन्यप्राणी असो. पण तो दिसणे हा नशिबाचाच भाग. अनेकदा संपूर्ण जंगल फिरून एकही प्राणी दिसून येत नाही तर एखाद्या वेळेस अचानक भररस्त्यात आपल्यासमोर एखादा वन्यप्राणी उभा ठाकतो. तेव्हा आपली उडालेली भंबेरी, निर्माण झालेला भीतीमिश्रित आनंद पाहण्याजोगा असतो. अस्वलाच्या अचानक दिसण्याने असेच काहीसे शनिवारी आयुध निर्माणी परिसरात घडले. आयुध निर्माणी परिसरात फेरफटका मारणाऱ्या अस्वलाला पाहात अनेक नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.
शनिवारी दुपारी आयुध निर्माणी परिसरातील टाइप १ सेक्टर १ जुने डीएससी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ नागरिकांना अस्वलाचे दर्शन झाले. पहिले पाण्याच्या टाकीजवळ नंतर बांबूंच्या झाडाजवळ व नंतर मुख्य रस्ता ओलांडून जंगलाच्या दिशेने जाताना अनेकांनी अस्वलाला पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी दत्ता खेडेकर यांनी सांगितले. तसेच रात्रीच्या सुमारास टाइप १ सेक्टर ४ मध्येही हेच अस्वल आढळून आले.
रस्ता ओलांडत असताना अस्वलाचे मध्येच थांबणे, इकडे तिकडे पाहणे, पुन्हा समोर जाणे, मान डोलावणे या कृतीमुळे नागरिक भारावून गेले. अस्वल रस्ता ओलांडताना काहींनी आपल्या दुचाकी मागे वळवल्या तर काही जण आहे, त्याच ठिकाणी उभे राहून त्याला पाहण्याचा आनंद लुटत होते.
===Photopath===
300521\img-20210530-wa0003.jpg
===Caption===
आयुध निर्माणी परिसरात फेरफटका मारताना अस्वल