दारूच्या ना हरकत प्रमाणपत्रावरून ग्रामसभेत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:30+5:302021-09-13T04:26:30+5:30
सावली : तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील ग्रामसभेत दारूच्या ना हरकत प्रमाणपत्राचा विषय सुरू असताना मारहाण करण्यात आल्याची तक्रार ...
सावली : तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील ग्रामसभेत दारूच्या ना हरकत प्रमाणपत्राचा विषय सुरू असताना मारहाण करण्यात आल्याची तक्रार कवींद्र रोहणकर यांनी केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रोहणकर यांनी वाईन शॉपसाठी अर्ज केला होता. ग्रामसभेत हा विषय सुरू असताना काही लोक एकालाच ना हरकत प्रमाणपत्र द्या आणि दुसऱ्याला नाही, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर रोहणकर यांनी ग्रामसभेत एकालाच नाही तर दोघांनाही द्या अन्यथा कुणालाच नाही, असे सांगितले. दरम्यान, ग्रामसभेतील अनिकेत विशाल शेडमाके नामक व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करुन अगांवर धावून मारहाण केली. त्या वेळी माझ्या मुलाने मध्यस्थी करताच माझ्या मुलाला जबर मारहाण केली. यात तो जखमी झाला, अशी तक्रार रोहणकर यांनी केली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध कलम २९४,३२३,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही रोहणकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
120921\img-20210911-wa0223.jpg
पत्रकार परिषदेला उपस्थित मंडळी