संकटावर मात करीत शेतकरी मशागतीत व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:15 AM2019-04-24T00:15:25+5:302019-04-24T00:16:08+5:30
सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे.
सततची नापिकी, सातत्याने राहत असलेले ढगाळ वातावरण, सरपणाची व्यवस्था, नागरणी, आदी कामे उरकविण्याच्या बेतात शेतकरी आहे. गुढीपाडव्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात करणाऱ्या बळीराजापुढे आर्थिक संकट उभे असले तरी शेतीची मशागत पुन्हा त्याच जोशाने सुरु केली असली तरी पुढील हंगामाच्या नियोजनाची काहीशी चिंता शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही शेतकºयांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कपाशीची वाळलेली रोपटे काढण्याचे काम सुरू असून शेताची नागरणी ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. यंत्रामुळे रोटावेटर, कल्टीवेटर आदी कामे करून तापत्या उन्हामुळे जमिनीची पोत कायम रहात असल्याचा समज आहे. शेतातील तण वेचणीची कामे सकाळच्या प्रहारात उरकविण्याचा सपाटा सुरू आहे. मुग नक्षत्राला अजून दोन महिन्यांचा कालावधी असल्याने कामे उरकवून लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी उसंत मिळणार आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतात काही शेतकºयांनी पालेभाज्या, लावल्या असून वाढलेल्या पालेभाज्या रखरखत्या उन्हामुळे अडचणीत सापडला आहे.
बैलांच्या किंमती वाढल्या
बैलांच्या किंमती महागल्याने बैलांची खरेदी कमी झाली आहे. शेती असणारे शेती करीत नाही, त्यामुळे शेतकामासाठी बैलजोडी किरायाने घ्यावी लागते. यासाठी मोसम पाहून जास्तीचे पैसेही वेळ प्रसंगी देऊन ही कामे उरकली जात आहे.
पेरणीचे नियोजन
येणाºया खरीप हंगामाला सामोरे जात असताना पारंपरिक पिकांनी सतत तीन वर्षांपासून पाठ फिरविल्याने व योग्य भाव मिळत नसल्याने कोणते पीक घ्यावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अनेकजण वेगळी पिके घेताना दिसत आहे.