चंद्रपूर रेल्वे स्थानकावरही मिळणार बांबूच्या देखण्या वस्तू

By राजेश मडावी | Published: August 17, 2023 08:01 PM2023-08-17T20:01:25+5:302023-08-17T20:01:33+5:30

‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत स्वातंत्र्यदिनी एक केंद्र सुरू करण्यात आले.

Beautiful bamboo items can also be found at Chandrapur railway station | चंद्रपूर रेल्वे स्थानकावरही मिळणार बांबूच्या देखण्या वस्तू

चंद्रपूर रेल्वे स्थानकावरही मिळणार बांबूच्या देखण्या वस्तू

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यात बांबूचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यामुळे बांबूवर आधारीत महिलांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी आता चंद्रपूर रेल्वे स्थानकावरही बांबूच्या देखण्या वस्तू विक्रीसाठी ‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत स्वातंत्र्यदिनी एक केंद्र सुरू करण्यात आले.

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रेल्वे स्टेशन, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे सोवनियर शॉपचे (बांबुच्या शोभिवंत वस्तुचे दुकान) उद्घाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.  पंतप्रधानांच्या संकल्पनेतून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेअंतर्गत हे केंद्र सुरू झाले आहे.

यातून बांबू कारागीर व स्वयंसहायता गटामधील महिलांच्या बांबू हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली. चंद्रपूर, गडचिरोली येथे बांबू आणि त्यावर आधारीत हस्तकलेला विशेष महत्त्व असून या क्षेत्राशी असंख्य बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिला जुळून आहेत. या सोवनियर शॉपच्या माध्यमातून हस्तकलेला व्यासपीठ मिळाले.

यावेळी बांबू केंद्राचे संचालक अविनाश कुमार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक देवगडे, कार्मिक निरीक्षक  मिश्रा, चंदेलकर, खुशिया लोकसंचालित समूह महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता गनफाडे तसेच तिनही विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिला, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Beautiful bamboo items can also be found at Chandrapur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.