चंद्रपूरच्या राजाचे मनोहारी रूप

By admin | Published: September 23, 2015 04:59 AM2015-09-23T04:59:49+5:302015-09-23T04:59:49+5:30

चंद्रपूरचा राजा जटपुरा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा फत्तेपूर सिखरीच्या बुलंद दरवाजाची प्रतिकृती साकारण्यात

Beautiful look of the King of Chandrapur | चंद्रपूरच्या राजाचे मनोहारी रूप

चंद्रपूरच्या राजाचे मनोहारी रूप

Next

चंद्रपूर : चंद्रपूरचा राजा जटपुरा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा फत्तेपूर सिखरीच्या बुलंद दरवाजाची प्रतिकृती साकारण्यात आली असून येथील देखावा पाहण्यासाठी भाविकांची दररोज गर्दी होत आहे.
मंडळाचे हे ४१ वे वर्ष असून यावर्षी मंडळाने देखावा व रोषणाईवर सुमारे १५ लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. फत्तेपूर सिखरीच्या बुलंद दरवाजासह गाभाऱ्यात राजवाड्याची अत्यंत सुंदर व मनमोहक सजावट करण्यात आली आहे. त्यात २१ फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली आहे. रत्नहिरे जडीत मूर्तीला दररोज नवनवे वस्त्र परिधान करण्यात येतात. दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक बेले, दिलीप कपूर, देवेंद्र बेले, अल्पेश जैन, बाळकृष्ण वैरागडे, प्रवेश बुटले, कमलेश वैराडे, कार्तीक आगडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Beautiful look of the King of Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.