सुंदर माझी अंगणवाडी अभियानास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:27 AM2021-04-06T04:27:03+5:302021-04-06T04:27:03+5:30

ग्रामस्थांचे लक्ष वेधत आहेत भिंतीचित्र बल्लारपूर : राज्य शासनाद्वारे वेळोवेळी अभियान राबविण्यात येते. यात ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रही सहभागी ...

Beautiful response to my Anganwadi campaign | सुंदर माझी अंगणवाडी अभियानास प्रतिसाद

सुंदर माझी अंगणवाडी अभियानास प्रतिसाद

Next

ग्रामस्थांचे लक्ष वेधत आहेत भिंतीचित्र

बल्लारपूर : राज्य शासनाद्वारे वेळोवेळी अभियान राबविण्यात येते. यात ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रही सहभागी झाले असून बामणी येथील अंगणवाड्याची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. भिंतीवर काढलेले थोर पुरुषांचे भिंतीचित्र व घोषवाक्य ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.

अलीकडे विभागातील सर्व कार्यालये व अंगणवाडीची स्वच्छता, रंगरंगोटी ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान सुरू आहे. या माध्यमातून बामणी येथील अंगणवाडीलाही सुशोभित करण्यात आले असून अलीकडेच अंगणवाडीत पेवर्स लावून सुशोभित करण्याचा प्रस्ताव बामणी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष ताजने, उपसरपंच जमील शेख, ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण शेंडे व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी मंजूर केला आहे. याशिवाय थोर पुरुषांचे प्रेरणादायी चित्र काढून जनजागृतीचे काम केले आहे. यामुळे अंगणवाडी केंद्र बामणी क्रमांक ७ ही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Beautiful response to my Anganwadi campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.