विद्यार्थी घडविण्यासाठी टेक्नोसॅव्ही व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:26 AM2018-08-03T00:26:44+5:302018-08-03T00:27:46+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन प्राचार्य धनंजय चापले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन प्राचार्य धनंजय चापले यांनी केले. जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्था, बाबूपेठ येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात ते बोलत होते.
शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, प्रा. गंगाधर वाळले, जगन्नाथ कापसे, प्रल्हाद खुणे, संजयकुमार मेश्राम, आयटी विभाग प्रमुख विनोद लवांडटे, विवेक इत्तडवार, धनराज येलमुलवार आदी उपस्थित होते. प्राचार्य चापले म्हणाले, शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. या बदलांमध्ये स्पर्धाक्षम विद्यार्थी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे नव्या युगाशी संवाद साधणारी ज्ञानसंपदा व तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठीच हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डोर्लीकर म्हणाले, आजच्या शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तकांचा वापर करून उपयुक्त ठरणार नाही. संगणकाच्या माध्यमातून जगभरातील ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी आता अद्ययावत राहिले पाहिजे.
टेक्नो हा उपक्रम प्रत्येक आठवड्यात शनिवारी घेतला जातो. तंत्रज्ञानाचा एक विषय घेऊन उपस्थित प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले जाते. यासाठी इच्छुक शिक्षकांना गुगुल लिंक आणि प्रशिक्षणाची महिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. उपक्रमात पाच हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ठ पुढे ठेवण्यात आले. टेक्नो कार्यशाळेत १५० शिक्षक सुट्टीच्या वेळात उपस्थित होते. माहितीच्या सादरीकरणासाठी शैक्षणिक साहित्य तसेच ज्ञानपूरक साहित्य निर्मितीसाठी पीपीटीद्वारे केले जात आहे. यासाठी जिल्हा आयटी सेलचे सदस्य निखील तांबोळी, गिरीधर पानघाटे, विठ्ठल आवंडे, वंदना वनकर, अर्चना जिरकुंटवार, यशवंत महल्ले, संगीता सराफ, नीता चहांदे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
सहभागी शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रास्ताविक प्रा. विनोद लवांडे तर संचालन अल्का ठाकरे यांनी केले. धनराज येलमुलवार यांनी आभार मानले. यावेळी संजय माथनकर, रवी तामगाडगे, उद्धव राठोड, कल्पना बन्सोड, कृतीक बुरघाटे उपस्थित होते.