वाघ शोधणाऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:00 AM2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:19+5:30

गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा संगमाजवळ पोहचला. तिथून वनकर्मचाºयांनी नावेने प्रवास करीत बेट गाठले. आठ वनकर्मचारी आणि बेटावरील दहा ते पंधरा शेतकºयांचा टिमने वाघाचा शोध सुरू केला. 

Bee attack on tiger hunters | वाघ शोधणाऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला

वाघ शोधणाऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला

Next
ठळक मुद्देवनकर्मऱ्यांसह २० गावकरी जखमी : बचावासाठी काहींची नदीपात्रात उडी

  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : शिवारात वाघोबा आल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी, वनमजूरांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वनकर्मºयांच्या सोबतीला दहा ते पंधरा गावकरी होते. वाघाचा शोध सुरू होता. याच दरम्यान मधमाश्यांनी हल्ला केला. धावाधाव सुरू झाली. मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी काहींनी नदी पात्रात उडी घेतली. धावपळीत काही जमिनीवर कोसळले. तर मधमाश्यांनी अनेकांना चावा घेतला.  या साºया प्रकारात वन कर्मचाºयांसह २० गावकरी किरकोळ जखमी झालेत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी गावाजवळ असलेल्या बेटावर रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा संगमाजवळ पोहचला. तिथून वनकर्मचाºयांनी नावेने प्रवास करीत बेट गाठले. आठ वनकर्मचारी आणि बेटावरील दहा ते पंधरा शेतकºयांचा टिमने वाघाचा शोध सुरू केला. 
शोधाशोध सुरू असताना दुपारच्या सुमारास बेटावरील एका झाडावर असलेल्या मधमाश्यांनी शोध घेणाºया टिमवर हल्ला केला. मधमाश्यांचा हल्ला होताच टिममधील सदस्यांची धावाधाव सुरू झाली. 
धावताना अनेकजण जमिनीवर पडल्याने किरकोळ जखमी झाले. मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी काहींनी नदीपात्रात उडी घेतली. तरीही मधमाश्यांनी अनेकांना चावा घेतला. टिममधील जवळपास सर्वच सदस्य जखमी झालेत. 
वाघ दिसला नाही मात्र मधमाश्यांनी दिलेल्या जखमा घेऊन वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी घाबरून घराचा रस्ता पकडला.

वाघ गेला कुठे?
शिवणी गावाजवळील बेटावर असलेल्या शेतशिवारात अनेकांना वाघ दिसला. हा वाघ तिथे कसा आला? त्याने कुणाची शिकार केली का? येथून तो कुठे गेला? या प्रश्नांचे उत्तर मिळू शकले नाही. वनकर्मचारी वाघाचा शोध घ्यायला गेले. मात्र मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे त्यांनाही तसेच परतावे लागले. 
 

शिवणी परिसरात वाघ आल्याची माहिती मिळाली. दोन वनरक्षक आणि वनमजुरांची टिम शोधाशोध करीत असताना मधमाश्यांनी हल्ला केला. काही किरकोळ जखमी झालेत.
- एस.जे.बोबडे, वनपरिक्षेत्राधिकारी,धाबा.

Web Title: Bee attack on tiger hunters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.