शेतीच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:02+5:302021-05-16T04:27:02+5:30

चंद्रपूर : कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र शेती कामे सुरुच राहणार आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातील कचऱ्याची सफाई ...

Beginning of farming | शेतीच्या कामाला सुरुवात

शेतीच्या कामाला सुरुवात

Next

चंद्रपूर : कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र शेती कामे सुरुच राहणार आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातील कचऱ्याची सफाई करणे, झाडे तोडणे, आदी कामाला सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची दहशत कायम आहे.

जागेचे पट्टे नियमित करावे

चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिक जागा मिळेल तिथे घर बांधून मोकळे होत आहे. तर काही ठिकाणी जागेचे पट्टे नियमित केले नसल्याने नागरिक घरकुलांपासून वंचित आहे. त्यामुळे महापालिकेने घरकुलाचे पट्टे नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनपाने नियमित स्वच्छता करावी

चंद्रपूर : शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

भिवापूर वाॅर्डातील रस्त्याची दुरवस्था

चंद्रपूर : येथील भिवापूर तसेच परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने रेलचेल असते. मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्यावरील मातीमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : शहरातील बहुतांश सिमेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. त्यामुळे माती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.

मजुरांमध्ये पुन्हा आले नैराश्य

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामाच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते. यातून रोजगार प्राप्त होत असतो. परंतु सध्या काही ठिकाणी ही कामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांमध्ये नैराश्य पसरले आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन मजुरांना काम मिळवून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

थकीत अनुदान त्वरित द्यावे

चंद्रपूर : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. यासाठी अनेकांनी अर्ज केले आहे. मात्र, विभागाकडे निधी नसल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे.

मोकळ्या जागांचा विकास करा

चंद्रपूर : शहरातील मोकळ्या जागेचा विकास करावा, अशी मागणी केली जात आहे. दोन वर्षापूर्वी काही ठिकाणी खेळण्याचे तसेच व्यायामाचे साहित्य लावून विकास केला होता. मात्र बहुतेक ठिकाणाची व्यायमाची साहित्य मोडकळीस आली आहेत. त्यामुळे त्या साहित्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बेरोजगार संस्था आर्थिक अडचणीत

चंद्रपूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी बेरोजगार संस्थाची निर्मिती करण्यात आली. मात्र या संस्थांना कामच मिळत नाही. शासनाने या संस्थांना काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र या संस्थाना अद्यापही पाहिजे तसे शासकीय कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावे

चंद्रपूर : शहरातील विविध वाॅर्डामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाईप टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. मात्र वेळीच दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा

चंद्रपूर : शहरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. मनपाने शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर बांधण्याची गरज आहे.

पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त

चंद्रपूर : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याच पशुपालकांकडे हाडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे. मात्र ते खरेदी करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने पशुपालकांची अडचण झाली आहे. पशुधन पाळण्यापेक्षा शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळत आहे.

मातीचे बंधारे बांधा

चंद्रपूर : वनविभागातर्फे जंगलात मातीचे बंधारे बांधण्यास आल्यास जनावरांना सोईचे होणर आहे. उन्हाळ्यात जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तसेच सिंचनासाठीसुद्धा पाण्याचा वापर करता येईल.

अनेक कार्यालयातील बॉयोमेट्रिक बंद

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील बॉयोमेट्रिक मशीन बंद आहेत. याचाच फायदा घेत कर्मचारी व अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहात नसल्याचे बघायला मिळत आहे. आता कोरोनाचे संकट असल्याने कर्मचाऱ्यांना ताण पडत आहे. परंतु, काही कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्य रस्त्यावरील दिशादर्शक बोर्ड तुटला

चंद्रपूर : लाखो रुपये खर्चून चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांवर मोठमोठे दिशादर्शक, गाव तसेच अंतर असलेले बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र यातील अनेक बोर्ड तुटले असून यामुळे बाहेरील नागरिकांना चुकीचा संदेश जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

वीज बिलामुळे

ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : लाॅकडाऊनमध्ये अनेक ग्राहकांनी वीज बिल थकविले होते. दरम्यान, आता बिल भरण्यासंदर्भात महावितरण करून वारंवार सूचना केल्या जात आहे. त्यामुळे बिल भरणे ग्राहकांना कठीण जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यामुळे अनेकांनी बिल थकविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

फायबर गतिरोधक बदलावे

चंद्रपूर : येथील हुतात्मा स्मारकाजवळील रस्त्यावर फायबर गतिरोधक लावण्यात आले आहे. मात्र यातील काही तुटले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे नव्याने फायबर गतिरोधक बसवावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Beginning of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.