माहिती न देणे भोवले; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:23+5:302021-09-02T04:59:23+5:30
तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर मेश्राम यांची २०११ मध्ये ब्लॉक फॅसिलेटर पदाची नियुक्ती केली. २०११ मध्ये चिमूर तालुक्यातील कवडशी रोडी ...
तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर मेश्राम यांची २०११ मध्ये ब्लॉक फॅसिलेटर पदाची नियुक्ती केली. २०११ मध्ये चिमूर तालुक्यातील कवडशी रोडी येथील सुरेखा रामदास ढोक ही मेरिट लिस्टप्रमाणे पदाकरिता पात्र असताना तिचा नंबर लागला नाही. तेव्हापासून झालेल्या अन्यायाविरुद्ध सुरेखा ढोक यांनी वारंवार भरती प्रक्रियेची माहिती मागितली. डॉ. मेश्राम यांनी अद्यापही ही माहिती अर्जदाराला पुरवली नाही. चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांकडून तसे आदेशसुद्धा देण्यात आले. आदेशाला न जुमानता डॉ. मेश्राम यांनी माहिती दिलीच नाही. त्यामुळे जनमाहिती अधिकारी डॉ. मेश्राम व प्रथम अपिलीय अधिकारी राजकुमार गहलोत यांच्यावर अनुक्रमे २५ हजार रुपये दंड, तर शिस्तभंगाची कार्यवाही माहिती आयुक्त यांच्याकडून करण्यात आली. या कार्यवाहीने चिमूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.