शिक्षक बनणे ठरत आहे दिवास्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:54 PM2017-09-04T22:54:59+5:302017-09-04T22:56:26+5:30
अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने जिल्ह्यातील ४५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक भरती बंद केली. दरम्यान मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. परिणामी अनेक डीटीएड व बीएड धारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.
पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.
त्यामुळे शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना शासनाने टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. परिणामी अनेक बेरोजगार शिक्षेकांची फौज निर्माण झाली. त्यातच अनेक शाळामधील शिक्षकांचे पद अतिरिक्त ठरत असल्यामुळे शिक्षकभरतीसुद्धा काही वर्षात होणार नसल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे अनेकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले. अशी प्रतीक्रिया अनेक शिक्षक पदविका संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी लोकमतजवळ दिली.
हलाकीची परिस्थिती असतानाही अनेकांनी शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्याबाहेर तसेच विदर्भाबाहेर जावून शिक्षक पदविका संपादन केली. त्यावेळी अनेकांना त्रास सहन करावा लागला. तरीही विद्यार्थ्यांनी पदवी संपादित केली.श्
मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज समिकरण बदलत चालले आहे. आहे त्या शिक्षकांनाच नोकरी टिकविणे कठीण जात आहे. त्यामुळे पदविका प्राप्त उमेदवारांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंग झाल्याचे चिन्ह दिसत आहेत.
टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी सीईटीच्या प्रतीक्षेत
शिक्षण पदविका घेतल्यानंतर सीईटी परीक्षा देण्यापूर्वी टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर सीईटी परीक्षेस पात्र ठरविण्यात येणार होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यी सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
खासगी शाळेत लाखो रुपयांची मागणी
शासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधार ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे. स