वर्धा नदीवरील बेलोरा, मुंगोली, धानोरा पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:49 PM2018-08-31T22:49:34+5:302018-08-31T22:50:06+5:30

या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते.

Belora, Mungoli, Dhanora Bridge on the Wardha River | वर्धा नदीवरील बेलोरा, मुंगोली, धानोरा पुलाची दुरवस्था

वर्धा नदीवरील बेलोरा, मुंगोली, धानोरा पुलाची दुरवस्था

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाने लक्ष द्यावे : पुलावर खड्डे व सळाखी बाहेर निघाल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. मात्र मागील काही वर्षात या पुलाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस पुलाची अवस्था दयनीय होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्धा नदी बेलोरा घाटावरील पूल तयार होऊन १९८७ मध्ये रहदारी सुरू झाली. टोल वसुली झाली. त्यानंतर वर्धा नदीच्या काठावर दोन्ही बाजुने वेकोलिने ओ. बी. (माती) टाकली. त्यामुळे सदर पुलाच्या बेलोरा साईडची माती पुराच्या पाण्याने वाहून गेली. पुलाला धोका निर्माण झाल्याने १९९९ मध्ये पुलाचे वाढीव काम करण्यात आले. त्यावेळीसुद्धा वाहनधारकाकडून टोल वसुली करण्यात आली होती. सदर पुलावरून मोठया प्रमाणात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस होत असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी बहार निघाल्या. पुलाची दूरवस्था झाली. वेकोलिच्या कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी वेकोलि व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. आणि उशिरा का होईना, मागील वर्षी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने एक कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजविण्यात आले. मात्र एका वर्षात या कामाला तडे जाऊ लागले. या पुलाच्या बाजूने दुचाकी व सायकलीच्या रहदारीकरीता व्यवस्था आहे. पुलावर सिमेंट कॉकेटचे पिल्लर टाकून ही व्यवस्था केली आहे. पण त्या रस्त्याच्या साफसफाईकडे संबंधिताचे दुर्लक्ष झाल्याने धुळ जमा होऊन पावसाने चिखल झाले आहे. सिमेंट कॉकेटचे पिल्लर अनेक ठिकाणी तुटून पडले असल्यामुळे रहदारी प्रभावित झाली आहे. जडवाहनांच्या रस्त्याने दुचाकीवरून प्रवास करावा लागतो.
वर्धा नदी धानोरा पुलावरून आंध्र, गडचांदूर कडून वणी, यवतमाळ, मुबंईकडे रात्रंदिवस जडवाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुर्दशा झाली. त्याच बरोबर सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडले. पुलाच्या सळाखी निघाल्यामुळे पुलाची दूरवस्था झाली. पुलाला कठडे नसल्याने व पडलेल्या खड्डयामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर पुलाच्या गंभीर समस्येबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते इबादुल हसन यांनी पुलावरील मोठमोठ्या खड्डयाचे फोटो काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना पाठविले आणि तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. यावर संबंधित अधिकाºयांनी पुलाची पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
हिच परिस्थिती वर्धा नदी मुंगोली पुलाची झाली आहे. सदर पुलावरून घुग्घुस मार्गे मुंगोली, सिंदोला, अदिलाबाद, वणीकडे जाणाºया वाहनाची वर्दळ असते. तसेच मुंगोली, कोलगाव कोळसा खाणीतून घुग्घुस रेल्वे सायडींग व चंद्रपूर, नागपूरकडे कोळसाची सुमारे २००४ पासून वाहतूक सुरू आहे. पुलाला कठडे नसल्याने अनेकदा ट्रक नदीत पडले. वारंवार कठडे लावण्याची मागणी झाल्यानंतर थातूरमातूर तारा बांधल्या आहे. पण पुलावर जागोजागी खड्डे पडले व सळाखी निघाल्याने पुलावरून वाहन नेताना चालकाला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.

Web Title: Belora, Mungoli, Dhanora Bridge on the Wardha River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.