बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:27+5:302021-03-05T04:28:27+5:30
घोसरी : मूल तालुक्यातील बेंबाळ प्रादेशिक योजनेचा शुद्ध पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने सात गावातील जनतेवर पाणी ...
घोसरी : मूल तालुक्यातील बेंबाळ प्रादेशिक योजनेचा शुद्ध पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद असल्याने सात गावातील जनतेवर पाणी टंचाई ओढवली असून अन्य स्त्रोतातील पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.
अनियमित पाणी पुरवठ्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेंबाळ प्रादेशिक योजनेचा शुद्ध पाणीपुरवठा परिसरातील बाबराळा, नवेगाव भुजला, बेंबाळ, घोसरी, नांदगाव तसेच गोवर्धन या गावातील जनता करिता केल्या जात असते. परंतु सदर योजनेचा पाणीपुरवठा पाईपलाईन लिकेजच्या सबबीखाली सतत खंडित असते.
सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक आहे. परंतु सदर पाणीपुरवठा गत चार दिवसांपासून बंद असल्याने अन्य स्रोतातील पाण्यावर तृष्णा भागविण्याची नामुष्की जनतेवर ओढवली आहे. एवढेच नव्हे तर कॅन विकत घेऊन जादा आर्थिक भुर्दंड पेलावे लागत आहे.
बेंबाळ- नांदगाव परिसरातील जनता सततच्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाईचा सामना करीत असल्याने वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष करणे गरजेचे झालेले आहे.