ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासाला खीळ

By admin | Published: November 29, 2014 12:57 AM2014-11-29T00:57:05+5:302014-11-29T00:57:05+5:30

ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही.

Bend the development due to the upliftment of Gramsevaks | ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासाला खीळ

ग्रामसेवकांच्या अपडाऊनमुळे विकासाला खीळ

Next

चंद्रपूर : ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही. त्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ग्रामीण भागाची एलर्जी झाल्यासारखे गावखेड्यापासून दूर राहतात. ज्यांच्या खांद्यावर ग्रामीण विकासाची धुरा आहे. तेच शासनाचे नोकरदार ग्रामीण क्षेत्राकडे पाठ फिरवित असल्याने ग्रामीण विकासात खिळ बसली आहे.
शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असताना अनेक ग्रामसेवक शासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. अनेक जण बाहेरगावाहून कार्यस्थळ असलेल्या गावास अपडाऊन करीत आहे. या अपडाऊनचा बराच वेळ जाण्यायेण्याला जातो. त्यामुळे त्यांच्या वेळेवर अपव्यय होतो. याशिवाय गावातील अनेक विकास कामांना खिळ बसते. गाव खेड्यांचा विकास व्हावा म्हणून शासन ग्रामीण विकासावर करोडो रुपये खर्च करते. त्या नियोजनाकरिता शासनाचे स्वतंत्र मंत्रालयही आहे. परंतु प्रत्यक्ष कामे करताना काही कर्मचारी आपले कर्तव्य इमाने इतबारे निभावत नसल्याच्या चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळतात. अपेक्षेप्रमाणे कामे प्रत्यक्षात न होता बरेचदा ती कागदोपत्रीच होतात. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येते.
ग्रामस्थांना विविध कामांक रिता दाखले लागतात. त्याची पूर्तता ग्रामसेवक करतात. शेतकरी व विद्यार्थियांना ग्रामसेवक गावात राहत नसल्यामुळे बाहेरगावी राहत असलेल्या ग्रामसेवकाचे घर शोधत कागदपत्रे मिळवावी लागतात. त्यात अनेकांना आर्थिक झळ व वेळेचा अपव्यय होतो. अनेकदा ग्रामसेवक न भेटल्याुळे हेलपाट्याा बसतात. मोबाई, करावा तर तो अनेकदा नॉट रिचेबल असतो. प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा अनुपस्थितीबाबत विचारणा केल्यास पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये बैठकीला होतो असे सांगून ग्रामस्थांची बोळवण केली जाते. ग्रामसेवकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतचा प्रभार असलल्यास तो ग्रामसेवक भेटायला मोठे भाग्यच लागते. ठिकठिकाणी असलेल्या बैठकांचे निमित्य काढून मूळ गावाला दांडी मारणे हे नित्याचेच झाले आहे.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Bend the development due to the upliftment of Gramsevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.