लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:10+5:302021-02-16T04:30:10+5:30

या लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान द्यावे अशी मागणी नगरसेवक राजू महाजन यांनी केली आहे सदर योजनेत लाभार्थ्यांना घरकुलाकरिता दीड लाख ...

Beneficiaries' dream of a home will be shattered | लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगणार

लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगणार

Next

या लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान द्यावे अशी मागणी नगरसेवक राजू महाजन यांनी केली आहे सदर योजनेत लाभार्थ्यांना घरकुलाकरिता दीड लाख रुपये केंद्र सरकार व एक लाख रुपये राज्य शासनाकडून दिल्या जाणार होते. वरोरा नगर परिषद ३२७ प्रकरणे मंजूर झाली. त्यातील ७० घरांची कामे सुरू आहे. काही घरे पूर्ण पूर्णत्वास आली. त्यांना राज्य शासनाचा एक लाख रुपयाचे अनुदान मिळाले. परंतु केंद्र सरकारकडून एक रुपयाचे अनुदान मिळाले नाही. घराच्या बांधकामाकरिता खासगी कर्ज काढून उधारीवर जुळवाजुळव केली. परंतु तीन वर्षाचा कालावधी लोटूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षांची प्रतीक्षा व अनुदानासाठी परवड लक्षात घेता लाभार्थ्यांना तत्काळ केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी नगरसेवक राजू महाजन यांनी केली असून या प्रश्नाबाबत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट राजू महाजन देणार असून लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करणार आहे.

Web Title: Beneficiaries' dream of a home will be shattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.