हजेरीपटाचे पैसे न मिळाल्याने लाभार्थी धडकले पंचायत समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:22+5:302021-09-16T04:34:22+5:30

त्यानंतर पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर ...

Beneficiaries hit Panchayat Samiti due to non-receipt of attendance fee | हजेरीपटाचे पैसे न मिळाल्याने लाभार्थी धडकले पंचायत समितीवर

हजेरीपटाचे पैसे न मिळाल्याने लाभार्थी धडकले पंचायत समितीवर

Next

त्यानंतर पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर स्वतः डॉ. राजेश कांबळे यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर चर्चा करून त्यांना सदर समस्या सोडवण्यास सांगितले. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता तांत्रिकदृष्ट्या समस्या असल्याने ही समस्या कायम असल्याचे सांगितले. मात्र अनेक घरकुल लाभार्थी नातेवाइकांकडून उसणवारी पैसे आणून घरकुलाची पूर्ण रक्कम लवकर मिळेल या आशेने घरबांधकाम पूर्ण करतात. मात्र आता पैसे न मिळाल्याने घरकुल लाभार्थी आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत. त्यामुळे शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत शिल्लक असलेले घरकूल बांधकामाच्या हजेरीपटाचे पैसे तत्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावे अन्यथा भविष्यात आंदोलन करण्याचा इशारा चिखलगाव ग्रा. पं. सदस्य ओमप्रकाश ढोरे, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष वसंता धांडे, सामाजिक कार्यकर्ता हरीदास दुपारे, माजी सरपंच भास्कर नाकतोडे यांनी दिला आहे.

150921\img-20210915-wa0049.jpg

लाभार्थी निवेदन देताना

Web Title: Beneficiaries hit Panchayat Samiti due to non-receipt of attendance fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.