६८ टक्के क्षय रुग्णांना पोषण योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:28 AM2021-08-15T04:28:24+5:302021-08-15T04:28:24+5:30

बॉक्स टीबीची लक्षणे काय सतत दोन आठवडे सायंकाळी ताप येणे, सतत दोन आठवडे खोकला असणे, वजनामध्ये लक्षणीय घट होणे, ...

Benefit of nutrition scheme for 68% TB patients | ६८ टक्के क्षय रुग्णांना पोषण योजनेचा लाभ

६८ टक्के क्षय रुग्णांना पोषण योजनेचा लाभ

googlenewsNext

बॉक्स

टीबीची लक्षणे काय

सतत दोन आठवडे सायंकाळी ताप येणे, सतत दोन आठवडे खोकला असणे, वजनामध्ये लक्षणीय घट होणे, खोकल्यानंतर ठस्यातून रक्त पडणे, मानेवर गाठी येणे, छातीत दुखणे, एक्सरे काढल्यानंतर अबनार्मल असणे आदी लक्षणे आढळून येतात.

बॉक्स

सहा ते एक वर्षात टीबीमुक्त

प्रथमत: सामान्य स्थितीत आजार असेल तर सहा महिन्यात हा आजार बरा होतो.

आजार अधिक काळापासूनचा असेल तर बरे होण्यासाठी साधारणत: एक वर्षाचा किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागत असतो.

कोट

क्षयरोगावर मोफत उपचार केला जातो, तसेच उपचारादरम्यान निक्षय पोषण योजनेंतर्गत ५०० रुपये प्रतिमाह अनुदान रुग्णांच्या खात्यात जमा करण्यात येते. ६८ टक्के रुग्णांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. बहुतेक जण आजार लपवित असतात; मात्र तसे न करता संबंधित आरोग्य केंद्रात दाखवून उपचार घ्यावा, तसेच बँक खाते व आधार क्रमांक जोडून निक्षय योजनेचा लाभ घ्यावा.

-डॉ. प्रकाश साठे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Benefit of nutrition scheme for 68% TB patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.