शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 12:39 AM2017-05-08T00:39:16+5:302017-05-08T00:39:16+5:30

पंचायत समिती भद्रावतीची वार्षिक आमसभा नगर परिषद भद्रावती सभागृहा नुकतीच पार पडली.

The benefits of government schemes are to the public | शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा

Next

धानोरकरांनी अधिकाऱ्यांना खडसावले : पं.स. वार्षिक आमसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : पंचायत समिती भद्रावतीची वार्षिक आमसभा नगर परिषद भद्रावती सभागृहा नुकतीच पार पडली.
या आमसभेच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर उपस्थित होते. तसेच तहसिलदार सचिन कुमावत, संविअ एस.तुपे, सहायक सं.वि.अ. संदीप गोडशेलवार, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पं.स. उपसभापती नागो बहादे, कृउबास सभापती वासुदेव ठाकरे उपस्थित होते.
जनसामान्यानी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करीत असताना उपस्थित अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराज होत आ. बाळू धानोरकरांनी काही विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत गेल्याच पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते प्रसार माध्यम राबवा अन्यथा याला अधिकारी वर्ग जबाबदार असेल असा दमच आ. धानोरकरांनी दिला. वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्रात दोन दिवस जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शोषखड्डे तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम ठरेल असेही ते याप्रसंगी म्हणाले.
मुख्यमंत्री पांदण रस्ता योजनेप्रमाणे आमदार पांदण रस्ता योजना राबवावी अशी मागणी याप्रसंगी माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केली. हा अभिनव उपक्रम असल्याचे आ. धानोरकर म्हणाले. तालुक्यातील कचराळा ते निखंजा पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत करण्याची मागणी भास्कर ताजणे यांनी केली. आमसभेत सार्वजनिक बांधकाम विभाग लघु सिंचाई, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. पशु संवर्धन विभाग कृषी विभाग, समाज कल्याण विभाग, पंचायत विभाग, मागास क्षेत्र अनुदान निधी सायकल, शिलाई मशीन पानी पुरवठ्याच्या प्रश्नावर साधकबाधक चर्चा झाली.

Web Title: The benefits of government schemes are to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.