बांधकामासाठी बांबू ठरू शकतो उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:26 PM2018-12-28T22:26:25+5:302018-12-28T22:26:47+5:30

जगातील ज्या देशांमध्ये बांबूची उपलब्धता आहे. तेथील स्थापत्य क्षेत्रात बांबूचा सर्वाधिक वापर दिसून येतो. पूर्वी बांधकाम साहित्यात बांबू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे माती व विटांसोबत वापरला जात होता. आज बांधकामात सिमेंट काँक्रीट वापरला जातो. परंतु, बांबूवर प्रक्रिया करून वापरल्यास सिमेंटला मजबूत व उत्तम पर्याय ठरू शकतो, असा दावा बांबू स्थापत्यतज्ज्ञ विहंग गडेकर यांनी केला. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी आले असता ते ‘लोकमत’ शी बोलत होते.

The best can be the bamboo for the construction | बांधकामासाठी बांबू ठरू शकतो उत्तम

बांधकामासाठी बांबू ठरू शकतो उत्तम

googlenewsNext
ठळक मुद्देविहंग गडेकर : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराच्या अनेक संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगातील ज्या देशांमध्ये बांबूची उपलब्धता आहे. तेथील स्थापत्य क्षेत्रात बांबूचा सर्वाधिक वापर दिसून येतो. पूर्वी बांधकाम साहित्यात बांबू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे माती व विटांसोबत वापरला जात होता. आज बांधकामात सिमेंट काँक्रीट वापरला जातो. परंतु, बांबूवर प्रक्रिया करून वापरल्यास सिमेंटला मजबूत व उत्तम पर्याय ठरू शकतो, असा दावा बांबू स्थापत्यतज्ज्ञ विहंग गडेकर यांनी केला. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी आले असता ते ‘लोकमत’ शी बोलत होते.
अहमदाबाद येथून स्थापत्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विहंग गडेकर म्हणाले, आपल्या परिसरात सहजरित्या उपलब्ध असलेला बांबू बांधकामात सिमेंट काँक्रीटसोबत कसा वापरता येतो, याचे जगभरात प्रयोग सुरू आहेत. बांधकामातील लोखंडाला बांबू हा पूरक पर्याय ठरला आहे. बांबूची आणि लवचिकता सर्वाधिक आहे. बांबू कमी किंमतीत सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतो. बांबूचा योग्य आणि नाविन्यपूर्ण कसा उपयोग केला जाऊ शकतो. सजावटीच्या वस्तू नव्हे तर मोठ्या इमारतींमध्येही बांबूचा कलात्मक वापर अत्यंत मजबूतीने करता येऊ शकते. भविष्यात हा सक्षम पर्याय म्हणून तयार होईल, याकडेही विहंग गडेकर यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यातील बांबू दर्जेदार
बीआरटीसीचे संचालक राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना दोन महिने प्रशिक्षण देण्याची संधी दिली. केंद्राच्या मापदंडानुसार परिसरात उपलब्ध असलेल्या बांबू प्रजातींंचा वापर कारागीर व महिला बचत गटांकडून तयार करता येऊ शकेल, अशा वस्तु निर्माण केल्या. यासाठी कटंग व लाठी प्रजातींचा वापर केला. चिचपल्लीतील बांबू केंद्रामध्ये विकासाच्या अनेक शक्यता आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संस्थेसाठी पुढाकार घेऊन विकासाच्या संधी निर्माण केल्याचा उल्लेखही विहंग गडेकर यांनी केला.

Web Title: The best can be the bamboo for the construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.