सावधान ! ५०० रुपयांच्या बनावट नोट बाजारात; वृद्ध महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:04 IST2024-08-31T14:00:39+5:302024-08-31T14:04:24+5:30
Chandrapur : ५०० रुपयांची बनावट नोट बाजारात आल्याने नागरिकांमध्ये भीती

Beware! Fake Rs 500 notes in the market; Fraud of an old woman
लोकमत न्यूज नेटवर
सिंदेवाही : शहरातील बाजारात मसाला साहित्य विक्रीचा व्यवसाय करणाया वृद्ध महिला व्यावसायिकाला एका ग्राहकाने ५०० रुपयांची बनावट नोट दिल्याची घटना गुरुवारी (दि. २९) उघडकीस आली. ही बनावट नोट दोन कागदाने जोडली असून, हिरव्या रंगाची तार नोटात टाकल्याचे दिसून येते.
सिंदेवाही शहरातील बाजारात एक महिला मसाला साहित्य विक्रीचा व्यवसाय करते. कुणी तरी अज्ञात ग्राहकाने १०० रुपयांचे साहित्य विकत घेऊन ५०० रुपयांची बनावट नोट दिली. त्याने उर्वरित ४०० रुपये घेऊन आम्ही थोड्या वेळात येतो, असे सांगितले व मसाला साहित्याची पिशवी तिच्याकडेच ठेवली. सायंकाळ होऊनही त्याने सामानाची पिशवी नेली नाही.
दरम्यान, याबाबत तिने बाजूच्या नागरिकांना विचारपूस केली. तेव्हा असाच प्रकार दोन-तीन ठिकाणी घडल्याची माहिती पुढे आली. ही बनावट नोट आणली कुठून, असा प्रश्न निर्माण होईल या भीतीने तक्रार केली नाही.