पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:20+5:302021-06-05T04:21:20+5:30

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, तसेच घरातील ओलसर ...

Beware of power system in rainy season | पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा

पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा

googlenewsNext

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. मुसळधार पाऊस आणि वादळ वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीज तारावर पडतात, तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकला जातो. परिणामी, वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे, या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, पावसाळ्यात घरातील स्वीच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी, घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करावी, ईएलसीबी वापरावे, घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा, घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावे, ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये, विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बॉक्स

यावर करा तक्रार

वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांची माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

Web Title: Beware of power system in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.