‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:44+5:302021-06-02T04:21:44+5:30
बॉक्स ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान मोबाइलवरील ॲप्स डाऊनलोड करताना आपण कोणत्याही सूचना न वाचता ॲग्री करत जातो. त्यामुळे धोका ...
बॉक्स
ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान
मोबाइलवरील ॲप्स डाऊनलोड करताना आपण कोणत्याही सूचना न वाचता ॲग्री करत जातो. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन ॲप्स डाऊनलोड करताना काळजी घेण्याची गरज आहे. ॲप बनावट तर नाही ना याची तपासणी करूनच डॉनलोड करावे.
बॉक्स
असा कॉल वा मेसेज आल्यास सावधान
१) मोबाइल कंपन्यांकडून सिम व्हेरिफिकेशनसाठी कधीच कॉल किंवा मेसेज करण्यात येत नाही. तसेच कागदपत्रांचीही मागणी होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे एखादा कॉल किवा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.
२) गेल्या काही दिवसांत फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून जवळच्या मित्रांना रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. त्यानंतर अडचणीत असल्याचे सांगून पैशाची मागणी करण्यात येत आहे.
३) चंद्रपुरात मागील काही रिक्वेट पाठवून पैसे मागण्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना आधी चौकशी करणे गरजेचे आहे.
बॉक्स
अशी घ्या काळजी
सिम व्हेरिफिकेशनसाठी मोबाइलवर मेसेज आल्यास त्यात दिलेली कोणतीही लिंक ओपन करून नये तसेच, ओटीपी कुणालाही पाठवू नये. मोबाइलवर पुढील व्यक्तीस बोलत असताना काळजी घ्यावी.
कोट
आपण सिम घेत असतानाच संपूर्ण कागदपत्र देत असतो. तेव्हाच आपले व्हेरिफिकेशन होत असते. त्यामुळे पुन्हा कोणत्याही कंपनीकडून व्हेरिफिकेशनसाठी मेसेज किंवा फोन केला जात नाही. त्यामुळे असा फोन किंवा मेसेज आल्यास त्याला कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. ऑनलाइन व्यवहार करताना जपून व्यवहार करा.
निशिकांत रामटेके, सहायक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर