भद्रावतीचा मोहर्रम ठरला सर्वधर्म समभावाचा प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:26 PM2017-10-05T23:26:27+5:302017-10-05T23:26:39+5:30

अलिकडे जातीधर्मावरून तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत असताना भद्रावती येथील कौमी एकता समितीच्या वतीने मागील अकरा वर्षांपासून शहरातील सर्व जातीधर्माच्या युवकांचे सहकार्य घेऊन....

Bhadravati's Muharram was the symbol of Sadhharma Sambhava | भद्रावतीचा मोहर्रम ठरला सर्वधर्म समभावाचा प्रतीक

भद्रावतीचा मोहर्रम ठरला सर्वधर्म समभावाचा प्रतीक

Next
ठळक मुद्देकौमी एकता समितीचे आयोजन : विधायक कार्याची परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती (आयुधनिर्माणी) : अलिकडे जातीधर्मावरून तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत असताना भद्रावती येथील कौमी एकता समितीच्या वतीने मागील अकरा वर्षांपासून शहरातील सर्व जातीधर्माच्या युवकांचे सहकार्य घेऊन मोहरम उत्साहात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे, धार्मिक अवडंबर न माजविता विधायक कार्याला प्राधान्य देण्याची भूमिका स्वीकारल्याने हा उत्सव सर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरला आहे.
शहरातील विविध जाती धर्माच्या युवकांनी एकत्र येऊन भद्रावती मोहरम बहुउद्देशीय उत्सव कौमी एकता समितीची स्थापना करण्यात आली. पदरमोड करून ही मंडळी उत्सव साजरा करीत आहेत. उत्सव समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीची परंपरा कायम ठेवली. यावर्षी सलग चार दिवस विविध वार्डांतून मुख्य मार्गाने रात्री भव्य मिरवणुक काढण्यात आली. भद्रावती शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकात सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत मोहरम उत्सवातून धार्मिक प्रबोधन करण्यात आले. यावेळी शहरातील सूमारे शंभर सवाºया, ताजे, पंजे, डोल्यांचे दर्शन भाविकांनी घेतले. भाविकांना दर्शन होता यावे , याकरिता महिला व पुरूषांची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली. मुख्य मार्गावर तोरणे, स्वागतहार, पताका तथा आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. उत्सवाने उद्घाटन आमदार बाळू धानोरकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अजय पद्मावार, अशपाक अली, के. जी. एन.चिकन सेंटर यांच्यातर्फे महाप्रसाद व श्रीकांत पिसेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शेख इसाक यांच्याकडून शरबत तथा उत्सव समितीकडून मिठाई व प्रसादाचे वितरण करण्यात आल. मोहरमचे वैशिष्ट्य म्हणजे गांधी चौकात मुख्यमर्गाच्या बाजूला एक उंच स्टेज तयार करून त्यावर उभे राहून राजू गैनवार आणि प्रा. घोडे हे सवाºयांचीे माहिती दिली. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी विशाल बोरकर, निलेश पटील, शेख रब्बानी, अजय पद्मावार,जावेद शेख, सागर जट्टलवार,प्रशांतबदखल, सागर भेले, मुकश पतरंगे,राकेश कटारे, शेख सलाम आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Bhadravati's Muharram was the symbol of Sadhharma Sambhava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.