भद्रावतीकरांची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:21 PM2018-06-05T22:21:05+5:302018-06-05T22:21:30+5:30

भद्रावती परिसरात वारंवार होत असलेला वीजेचा लंपडाव, अवैध दारूविक्री तसेच दररोज होणारी इंधन वाढ व महागाईच्या विरोधात गांधी चौक दुर्गा उत्सव समिती तसेच सर्वपक्षीयांद्वारे सोमवारी तहसील कार्यालयार मोर्चा काढण्यात आला.

Bhadrawatikar's Tehsil office hit | भद्रावतीकरांची तहसील कार्यालयावर धडक

भद्रावतीकरांची तहसील कार्यालयावर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : मोर्चात सिलिंडरची प्रेतयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती परिसरात वारंवार होत असलेला वीजेचा लंपडाव, अवैध दारूविक्री तसेच दररोज होणारी इंधन वाढ व महागाईच्या विरोधात गांधी चौक दुर्गा उत्सव समिती तसेच सर्वपक्षीयांद्वारे सोमवारी तहसील कार्यालयार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. मोर्चामध्ये तीनचाकी रिक्षात मोटारसायकल व सिलिंडर ठेवून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.
मागील काही महिन्यांपासून भद्रावती परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. उष्ण तापमानामुळे भद्रावतीकरांचे हाल होत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरु आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचचे दुर्लक्ष होत आहे. शालेय विद्यार्थीसुद्धा अवैध दारुविक्री करीत आहेत. त्यामुळे देशाचे भविष्य धोक्यात दिसून येत आहे. शहरात चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज इंधन दरवाढ होत आहे. तसेच महागाई वाढत आहे, या विरोधात भद्रावतीकरांनी मोर्चा काढला होता.
डिझेल, पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे, अवैध दारू विक्री बंद झालीच पाहीजे, शहरात सुरु असलेला विजेचा लंपडाव थांबलाच पाहिजे आदी घोषणा मोर्चा दरम्यान देण्यात येत होत्या. यावेळी मोर्चेकरी तहसील कार्यालयात जावून तहसीलदार, ठाणेदार तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना आपली निवेदन सादर केली. १५ दिवसात या समस्यांचे निराकरण न आल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीयांद्वारे यावेळी देण्यात आला. ३० जूनपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
यावेळी नगराध्यक्ष अनील धानोरकर, गांधी चौक दुर्गा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष संजय बॅनर्जी, प्रकाश पाम्पट्टीवार, राजू गैनवार, राजू कोठारी, संतोष आमने, ज्ञानेश्वर डुकरे, रमेश मेश्राम, प्रविण महाजन, सुयोग भोयर, वसंता उमरे, विनोद वानखेडे, प्रफुल्ल चटकी, प्रशांत झाडे, डॉ. राकेश तिवारी विनोद घोडे विवेक आकोजवार, बाळू गुंडावार, माया नारळे, आशा निंबाळकर, नालंदा पाझारे, माधुरी कळमकर, प्रमोद गेडाम, अब्बास अली, दयाल हरियाणी, पांडुरंग टोंगे आदी उपस्थित होते.

Web Title: Bhadrawatikar's Tehsil office hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.