कोरोना प्रतिबंधासाठी भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:41 AM2021-02-26T04:41:00+5:302021-02-26T04:41:00+5:30
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असला तरी ग्रामस्थांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. ग्रामस्थ विनामास्क ...
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असला तरी ग्रामस्थांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. ग्रामस्थ विनामास्क फिरताना आढळून आल्यास ५०० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश या पथकांना देण्यात आले आहेत.
कानपा - मौशी या जिल्हा परिषद गटात पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी श्वेता राऊत या पथकाच्या प्रमुख आहेत. एस. डी. खनके आणि शुभम भडके यांची या पथकात नियुक्ती आहे. वाढोणा गिरगाव जिल्हा परिषद गटात कृषी विस्तार अधिकारी जी. जी. खोब्रागडे पथक प्रमुख आहेत. उमेश हिवरे आणि हिरालाल गजभिये या पथकाचे सदस्य आहेत. तळोधी गोविंदपूर जिल्हा परिषद गटात कृषी विस्तार अधिकारी एस. व्ही. तिवारी हे प्रमुख आणि कतलाम व नागोसे या पथकात आहेत. पारडी बाळापूरमध्ये मोहित नैताम हे प्रमुख, तर अमीर पठाण व मोडक या पथकात आहेत.
कोरोना या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध घालण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत, याची माहितीही या पथकाद्वारे देण्यात येणार आहे. नागभीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे यांच्या मार्गदर्शनात ही पथके कार्यरत आहेत.