वामनराव चटप यांना भारत ज्योती अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:58+5:302021-04-14T04:25:58+5:30

ॲड. वामनराव चटप हे मागील ४० वर्षांपासून राजकीय, सामाजिक, शेती व वकिली क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सार्वजनिक क्षेत्रात कार्याचा ...

Bharat Jyoti Award to Wamanrao Chatap | वामनराव चटप यांना भारत ज्योती अवॉर्ड

वामनराव चटप यांना भारत ज्योती अवॉर्ड

googlenewsNext

ॲड. वामनराव चटप हे मागील ४० वर्षांपासून राजकीय, सामाजिक, शेती व वकिली क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सार्वजनिक क्षेत्रात कार्याचा दांडगा अनुभव आहे. आमदार असताना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना मिळाला असून ते शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत. शेतकरी व कष्टकरी जनतेसाठी तसेच स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणारे लढवय्ये नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नक्षलवादी क्षेत्राचे पंधरा वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना कुठलीही सुरक्षा न घेणारे, सार्वजनिक जीवनात पारदर्शकता व चारित्र्य राखणारे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, शेतमालाला रास्त भाव मिळावा आणि तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी चाळीस वर्षांपासून अव्याहतपणे लढा देत आहेत. ॲड. चटप हे दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते असून त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याची दखल घेऊन आणि जीवनातील पैलूला प्राधान्य देऊन त्यांची या अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून हा पुरस्कार ख्यातनाम क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शिक्षणमहर्षी व बिहारचे राज्यपाल डी. वाय. पाटील या दोघांनाच मिळाला होता. विदर्भातून हा सन्मान मिळणारे ॲड. चटप हे पहिले व्यक्ती आहेत, हे विशेष.

Web Title: Bharat Jyoti Award to Wamanrao Chatap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.