भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन
By Admin | Published: November 15, 2016 12:57 AM2016-11-15T00:57:44+5:302016-11-15T00:57:44+5:30
जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : समस्या सोडवा
ब्रह्मपुरी : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहे. परिणामी शेतकरी मानसिक विवंचनेत आत्महत्या करत आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव देण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत, शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे परिसातील शेतकऱ्यासह भारतीय किसान सभेच्या सदस्याने आंदोलन केले.
यामध्ये प्रामुख्याने धानाला उत्पादन खर्चानूसार किमान प्रतीक्विंटल ३५०० रुपये भाव मिळावा, बारमाही सिंचन व्यवस्था, नियमित व अल्पदरात वीज पुरवठा, शेतातील सागवन व इतर झाडे कापण्याची विनाअट त्वरित परवानगी देण्यात यावी, पांदन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे, शेतमालाची बाजार समित्यामध्येच खरेदी विक्री तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोजमाप व विक्री करण्यात यावी, शेतीचे फेरफार व इतर कामे विनामूल्य व अल्पावधीत करण्याची तरतूद करण्यात यावी, ६० वर्ष वयातील शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशा विविध मागण्याचे निवेदन ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सदर मागण्यावर गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष दादा पारधी, मनोहर बोरकर, वामनराव भुसारी, माधवराव पारधी, केशवराव सुर्यवंशी, विनायकराव कुर्वे, श्रीराम समर्थ, शिवाजी सोनवाने, माधव ठाकरे, शालीकराम चौके, विठोबा लांजेवार, महिला प्रमुख सविता पारधी, सुमन भोयर, शारदा माकडे, चंद्रभागा पारधी, गीता सुकारे, प्रमीला भागडकर, सावरकर तसेच भारतीय किसान संघाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)