भारिपचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:58 AM2018-04-23T00:58:17+5:302018-04-23T00:58:17+5:30
कठुआ, उन्नाव व देशातील इतर ठिकाणी मुली व महिलांवर अमानुष अत्याचार करणाºया आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कठुआ, उन्नाव व देशातील इतर ठिकाणी मुली व महिलांवर अमानुष अत्याचार करणाºया आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
भाजप सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशी घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. मात्र देशात मुली व महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच देशभक्तीच्या नावावर भाजपांकडून बलात्काºयांची पाठराखण करण्यात येत आहे. परिणामी देशातील महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे महिलांना सुरक्षित करण्याकरिता भाजपा हटाओ, बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आता आली आहे. कठुआ व उन्नाव या दोन बलात्कार आणि हत्यांमुळे देशात अस्वस्थता व दहशत पसरली आहे. याला जबाबदार जम्मू-काश्मिरचे बीजेपी, पिडीपी सरकार व युपीचे बीजेपीचे योगी सरकार आहे. त्यामुळे यावेळी भाजप व सरकारचा व दोन्ही घटनांचा निषेध करण्यात आला. तसेच घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्याना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाद्वारे करण्यात आली.
यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदिप खोब्रागडे, महासचिव धिरज बांबोडे, महिला जिल्हाध्यक्ष लता साव, राजू कीर्तक, रूपचंद निमगडे, पी. डब्ल्यू. मेश्राम, कल्पना अलोणे, अविंता उके, तनुजा रायपूरे, निशा ढेंगरे, रमेश ढेंगरे, सुमीत मेश्राम, धिरज तेलंग, नेहा मेश्राम, रूचा लोणारे, बंडू ढेंगरे, रामजी जुनघरे, अशोक, भिमलाल साव, रायपूरे आदी उपस्थित होते.
कोरपना येथे कॅन्डल मार्च
कोरपना येथे सर्वपक्षीय संघटनेतर्फे अत्याचार घटनेच्या निषेधार्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते टिपु सुलतान चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष नंदा बावणे, वर्षा पेदांने, शहारान अली, आबीदभाई, विजय बावणे, अशोक डोहे, डॉ खान, विजय जिवणे, अमोल आसेकर, हरीदास गौरकार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.