१०० टक्के कृषी वीजबिल भरणारी भटाळी ठरली महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:42+5:302021-03-05T04:28:42+5:30
सरपंच सुधाकर रोहणकर यांचा सत्कार भद्रावती : कृषी वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या हस्ते ...
सरपंच सुधाकर रोहणकर यांचा सत्कार
भद्रावती : कृषी वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्व व उद्घाटन सोहळा फेसबुक लाइव्ह कार्यक्रमाद्वारे पार पडला.
भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत भटाळी ही १०० टक्के कृषी वीजबिल भरणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली.
भटाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांचा मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ सुनील देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरपंच सुधाकर रोहणकर यांनी सप्टेंबर २०२०च्या चालू कृषी वीजबिलाचा भरणा करण्यासाठी गावातील कृषिपंपधारकांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार भटाळी गावातील कृषिपंपधारकांनी चालू बिलाचा भरणा केला केला होता.
सत्कार कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या संध्या चिवडे, कार्यकारी अभियंता फारस खानेवाला, उपकार्यकारी अभियंता सचिन बदखल, श्रीकांत खरकाटे उपस्थित होते.