जागा नसतानाही तलावाचे भूमिपूजन

By admin | Published: January 3, 2015 11:00 PM2015-01-03T23:00:27+5:302015-01-03T23:00:27+5:30

साखरवाही येथील तलाव बांधकामासाठी जागा उपलब्ध नसतानासुद्धा दोन कोटी ८२ लाखांच्या कामाचे भूमिपूजन लघुसिंचन अधिकाऱ्यांनी उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Bhavipujan of the lake, in spite of the absence of the place | जागा नसतानाही तलावाचे भूमिपूजन

जागा नसतानाही तलावाचे भूमिपूजन

Next

राजुरा : साखरवाही येथील तलाव बांधकामासाठी जागा उपलब्ध नसतानासुद्धा दोन कोटी ८२ लाखांच्या कामाचे भूमिपूजन लघुसिंचन अधिकाऱ्यांनी उरकून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
येथील लघुसिंचन विभागाच्या वतीने साखरवाही, सुमठाणा, बोडखा शेतशिवारात लघुपाटबंधारे तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे १६० हेक्टर शेतजमीन ओलित होणार आहे. साखरवाही व बोडखा या शिवारातील १८ शेतकऱ्यांच्या २९ हेक्टर शेतजमिनी अधिगृहित होणार आहेत. यासाठी मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. सध्या या जमिनीवर पिके उभे असून जोपर्यंत कोरडवाहू शेतीला १० लाख व ओलित शेतीला १२ लाख रुपये भाव मिळणार नाही, तोपर्यंत जमीन देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
कल्याणकारी व लोकउपयोगी प्रकल्प तत्कालिन आमदार सुभाष धोटे यांनी कार्यान्वित केला होता. या प्रकल्पात बोेडखा येथील दहा, साखरवाही येथील आठ शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहित होणार आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. उद्देश चांगला असला तरी शासनाकडे सध्या या प्रकल्पासाठी जागा नाही. असे असतानाही १२ आॅगस्ट २०१४ ला या तलाव प्रकल्पाचे थाटात भूमिपूजन करण्यात आले. कार्यालयीन फाईलीमुळे अजूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. या तलावासाठी आनंद पडवेकर, तुकाराम आसूटकर, प्रभाकर चोथले, प्रभाकर लोहे, किसन आसूटकर, देविदास वांढरे, जगन्नाथ वांढरे, पुरुषोत्तम आसूटकर, नागु डवरे, जनार्दन मत्ते, विजय झाडे, सावत्राबाई आगलावे मनोज आगलावे, किसन आसूटकर, नानाजी चौथले, शंकर आसूटकर या १८ शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Bhavipujan of the lake, in spite of the absence of the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.