भेदोडा बनले चोर बीटी पुरवठ्याचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:17+5:302021-04-12T04:26:17+5:30
राजुरा : तेलंगणा राज्यातून चोर बीटीची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून राजुरा तालुक्यातील भेदोडा हे चोर बीटी ...
राजुरा : तेलंगणा राज्यातून चोर बीटीची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून राजुरा तालुक्यातील भेदोडा हे चोर बीटी पुरवठ्याचे प्रमुख केंद्र बनले असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल करण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यातील भेदोडा येथून तेलंगणा राज्यात चोरबीटीची ट्रकमधून वाहतूक करीत असताना पोलिसांना शंका आल्याने ट्रकची तपासणी केली असता ट्रकमधून १७ क्विंटल चोरबीटी शिरपूर परिसरात (तेलंगणा, जि. आदिलाबाद) जप्त करण्यात आली. यात शिरपूर पोलिसांनी अशोक गद्दमवार यांना शुक्रवारी अटक केली आहे. अशोक गद्दमवार हा यल्लया रेड्डी यांचा दिवाणजी असून गुप्त माहितीच्या आधारे यल्लया रेड्डी हा तेलंगणातून चोर बीटी आणून भेदोडा येथे साठवून ठेवत होता आणि महाराष्ट्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यात व तेलंगणा राज्यात विक्री करीत होता. चोर बीटीचा पुरवठा असलेल्या भेदोडा येथून चोर बीटी तेलंगणा राज्यात विक्रीसाठी नेत असताना शिरपूर पोलिसांनी १७ क्विंटल चोर बीटी जप्त करण्यात आली. ही चोर बीटी अशोक गद्दमवार यांनी ट्रकमध्ये भरून दिली होती. राजुरा तालुक्यात चोर बीटीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून पोलिसांनी पुन्हा सखोल चौकशी केल्यास चोर बीटीचे मोठे रॅकेट उघड होऊ शकते.