'बिबट ग्राम सत्याग्रह', ईको-प्रोने जुनोना गावात आंदोलन
By साईनाथ कुचनकार | Published: December 13, 2023 06:01 PM2023-12-13T18:01:46+5:302023-12-13T18:02:25+5:30
ईको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर : जिल्ह्यात 'मानव-वन्यप्राणी संघर्ष' तीव्र झाला आहे. यात वाघ, बिबट, अस्वल अन्य वन्यप्राण्यांकडून जंगलात तसेच गावात होणारे हल्ले रोखण्याकरिता ‘बिबट समस्यामुक्त ग्राम योजना’ राबवावी, या मागणीला घेऊन ईको-प्रोने जुनोना गावात आंदोलन केले.
ईको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सकाळी जुनोना गावात बिबटचा वावर असलेल्या वस्तीत जाऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. बिबट गावात येण्याचे कारण यावर माहिती देण्यात आली. बिबट गावात आल्यावर गावकऱ्यांवर हल्ले करतात. त्यानंतर बिबट्यास जेरबंद करणे यापेक्षा बिबट गावातच येणार नाही याकरिता काय केले पाहिजे, गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या माध्यमाने काय उपाययोजना केल्या पाहिजे, बिबट गावात येणार नाही यासाठी "बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना" प्रभावी ठरणार असल्याची माहिती देत ही योजना प्रत्येक बिबट समस्या असलेल्या गावात प्राधान्याने राबवावी, अशी मागणी या आंदोलनाप्रसंगी करण्यात आली.
बिबट ग्राम सत्याग्रह आंदोलनात बंडू धोतरे, नितीन रामटेके, कुणाल देवगीरकर, राजू काहिलकर, ओम वर्मा, धर्मेंद्र लुनावत, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, सुन्नी दुर्गे, रोहित तळवेकर, मेघश्याम पेटकुले, योजना धोतरे, सुभाष टिकेदार सहभागी झाले होते. येत्या काळात या मागणीकरिता तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे बंडू धोतरे यांनी म्हटले आहे.