विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 12:35 AM2017-02-07T00:35:41+5:302017-02-07T00:35:41+5:30

अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या वतीने सभोवतालच्या गावातील तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन विद्यालयापर्यंत पायदळ प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

Bicycle delivery to the girls | विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

Next

गडचांदूर : अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या वतीने सभोवतालच्या गावातील तीन ते चार किलोमीटर अंतरावरुन विद्यालयापर्यंत पायदळ प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.
देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याकरिता शासन प्रयत्नरत आहे. मात्र आजही अनेक समस्यांमुळे तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मनोबल, धैर्य, आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थिनींचे भविष्य उज्वल करण्याचा आम्ही प्रयत्न करू, याकरिताच सायकल वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला, असे प्रतिपादन अल्ट्राटेक सिमेंट कंपचीने युनिट हेड जी.बाल सुब्रम्हण्यम यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनिल पिल्लई, अलोक निगम, आनंद लोहिया, गणेश जयवेल्लू, जी. बाल. सुब्रम्हण्यम, कल्पना निगम, जयवैल्लू, अल्ट्राटेक फाऊंडेशनचे उपमहाव्यवस्थापक मेजर आशिष पासबोला उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान राजुरगुडा येथील ६, कोल्हापुरगुडा ६, नोकारी ३, पालगाव २, तळोधी ५, बिबी ४ अशा एकूण २६ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अल्ट्राटेक फाऊंडेशनचे सहायक महाप्रबंधक संजय पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नितेश मालेकर, देविदास मांदाडे, संजय ठाकरे व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Bicycle delivery to the girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.