दिव्यांगांना सायकल, बेरोजगार महिलांना शिलाई मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:26+5:302021-06-16T04:37:26+5:30

मनसेचा उपक्रम : अनेकांना मिळाला आधार चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगार झालेल्या महिलांना शिलाई मशीन, तसेच दिव्यांग बालकाचा तीनचाकी ...

Bicycles for the disabled, sewing machines for unemployed women | दिव्यांगांना सायकल, बेरोजगार महिलांना शिलाई मशीन

दिव्यांगांना सायकल, बेरोजगार महिलांना शिलाई मशीन

Next

मनसेचा उपक्रम : अनेकांना मिळाला आधार

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगार झालेल्या महिलांना शिलाई मशीन, तसेच दिव्यांग बालकाचा तीनचाकी सायकल, तसेच त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सामाजिक भान जपले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मनसेतर्फे एका दिव्यांग बालकाला तीनचाकी सायकल भेट देऊन त्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला. सोबतच कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. अशा महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यासाठी वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष बळिराम शिंदे, शहर अध्यक्ष असलम खान, शहर उपाध्यक्ष जफर बेग, महिला जिल्हाउपाध्यक्षा माया मेश्राम, शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर, मनीषा तोकलवार, आदींनी पुढाकार घेतला. तसेच पुढेही सामाजिक बांधीलकी जपण्याचा निर्धार करण्यात आला.

Web Title: Bicycles for the disabled, sewing machines for unemployed women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.