बापरे बाप! दवाखान्यात शिरला भलामोठा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:24 PM2020-07-11T20:24:11+5:302020-07-11T20:24:35+5:30

दुर्गापूर- ताडोबा रोडवर असलेल्या डॉ. राजुरकर यांच्या दवाखान्यात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान भला मोठा अजगर जातीचा साप असल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली.

A big snake entered the hospital in Chandrapur district | बापरे बाप! दवाखान्यात शिरला भलामोठा साप

बापरे बाप! दवाखान्यात शिरला भलामोठा साप

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील दुर्गापूर- ताडोबा रोडवर असलेल्या डॉ. राजुरकर यांच्या दवाखान्यात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान भला मोठा अजगर जातीचा साप असल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली.
दवाखान्यात साप दिसताच तेथील नर्स घाबरून बाहेर आली व त्यांनी आजूबाजूचा नागरिकांना साप असल्याची माहिती दिली. तेथील नागरिकांनी वन्यजीव रक्षक साईनाथ चौधरी आणि लखन तुरक यांना माहिती दिली. लगेच साईनाथ, लखन, अनिल पटले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता अजगर जातीचा साप सहा फूट लांबीचा होता. त्याला पकडून वनविभागाचे अधिकारी कारेकर यांना माहिती दिली. त्यानंतर त्या अजगराला जंगलात सोडून देण्यात आले. तेव्हा कुठे सगळ््या नागरिकांनी व दवाखान्यातील रुग्णांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Web Title: A big snake entered the hospital in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप