‘बिगारी’ ने चालतात जंगलातील कामे

By admin | Published: January 30, 2016 01:23 AM2016-01-30T01:23:57+5:302016-01-30T01:23:57+5:30

मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्हारपूरअंतर्गत तोहोगाव वनक्षेत्रात जंगलात काम करणाऱ्या बैलबंडी मजुरांना मजुरीच्या मोबदल्यात जळावू लाकडे ...

'Bigger' runs the forest works | ‘बिगारी’ ने चालतात जंगलातील कामे

‘बिगारी’ ने चालतात जंगलातील कामे

Next

तोहोगाव वनक्षेत्रातील प्रकार: मजुरीच्या मोबदल्यात जळावू लाकडे
कोठारी: मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्हारपूरअंतर्गत तोहोगाव वनक्षेत्रात जंगलात काम करणाऱ्या बैलबंडी मजुरांना मजुरीच्या मोबदल्यात जळावू लाकडे देवून काम करण्याची मागील दोन वर्षापासून प्रथा सुरु आहे. ती यावर्षीही सुरु आहे. या प्रथेला बिगारी असे संबोधल्या जाते. ती लाठी, वामनपल्ली, सोनागपूर, वेळगाव, आदी गावात प्रचलीत आहे. यात महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून संबंधित वनपाल स्वत:ची झोळी भरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
तोहोगाव वनपरिक्षेत्रात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ११ कक्षामधून ६०० ते ७०० जळावू बिट तोडण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी कक्ष क्र. ४८, ३९, २२, ३३, ३४, ५६, ३६, ४९, २९ व ५० मध्ये बिट कटाईची कामे सुरु आहेत. यात लाठी, वामनपल्ली, पारडी या भागातील जंगलाची जबाबदारी वाडावा या वनपालाकडे सोपविण्यात आली. त्यांनी तोडलेली बिट वाहतूक करण्यासाठी वामनपल्ली, पारडी व सोनापूर येथील बैलबंडीधारकांना बिगारी तत्वावर कामाल लावले दिवसभर बिट जंगल डेपोपर्यंत वाहतूक करुन सायंकाळी घरी परत जात असताना बंडीभर लाकडे घेवून जायचे. मात्र दिवसभर केलेल्या कामाची मजुरी मागायची नाही असा अलिखित करार करण्यात येतो. वर्षभर जाळण्यासाठी लाकांडची गरज असते व ते जंगलातून आणल्यास वन कर्मचारी त्रस्त करतात. त्यापेक्षा बिगारी कामे करण्याचे पसंत करतात. यात वनपालाचे विनापैशाने काम होते व गावकऱ्यांना बिना त्रासाने लाकडे मिळतात. यात संबंधित वनकर्मचारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून स्वत:चे खिसे भरतो व जंगलाची अधिकारची तोड करुन महामंडळाचे आर्थिक नुकसान करतो. (वार्ताहर)

Web Title: 'Bigger' runs the forest works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.