महावितरणच्यातर्फे मूलमध्ये बाइक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:13+5:302021-03-20T04:26:13+5:30
मूल : महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत कृषिपंपधारकांना जास्तीतजास्त फायदे पोहोचविण्याच्या दृष्टीने मूल तालुक्यात जनजागृती करण्यासाठी स.व.सु उपविभाग मूल महावितरणच्या ...
मूल : महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत कृषिपंपधारकांना जास्तीतजास्त फायदे पोहोचविण्याच्या दृष्टीने मूल तालुक्यात जनजागृती करण्यासाठी स.व.सु उपविभाग मूल महावितरणच्या वतीने बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर रॅलीला मूल नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, महावितरणचे विभागीय अधिकारी उदयकुमार फरास खानेवाला यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
कृषिपंप धोरण २०२० नुसार कृषिधारकांना ३१ मार्च, २०२२ पर्यंत वीजबिल भरणा केल्यास सप्टेंबर, २०२०च्या थकबाकीदारास सरसकट ५० टक्के वीजबिल माफ करण्यात येणार आहे. मूल उपविभागांतर्गत ५२० कृषिपंपधारकांनी या योजनेचा फायदा घेऊन जवळपास ३६ लाखांचा भरणा करून, या योजनेचा लाभ घेतला आहे. कृषीधारकांनी या योजनेचा विनाविलंब फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले.
सदर रॅलीमध्ये मूल उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता चंदन चैरसिया, शाखा अभियंता मनोज रणदिवे तथा महावितरणचे कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.