नळजोडणी नसतानाही मोठ्या रकमेची बिल आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:39+5:302021-06-11T04:19:39+5:30
रमेश निषाद यांनी घरी नळ घेण्याकरिता मजीप्राकडे दोन वर्षांपूर्वी डिमांडची राशी भरली होती. दोन वर्षे होऊनही नळजोडणी झाली नाही. ...
रमेश निषाद यांनी घरी नळ घेण्याकरिता मजीप्राकडे दोन वर्षांपूर्वी डिमांडची राशी भरली होती. दोन वर्षे होऊनही नळजोडणी झाली नाही. नळजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या निषाद यांना ग्राहकसंख्या डीआर-१३१५० असे नमूद करून एकदा १३०० रुपये, तर दुसऱ्यांदा दोन हजार रुपयांचे बिल मजीप्राने त्यांच्याकडे पाठविले. त्यांनी तशी तक्रार मजीप्राकडे केली आहे. असाच प्रकार पाच सहा महिन्यांपूर्वी येथील पत्रकार मंगेश बेले यांच्याबाबत घडला आहे. वारंवार असे प्रकार घडल्याने मजीप्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहे.
कोट
नळजोडणीकरिता रितसर अर्ज करून त्याची यादी कंत्राटदाराला दिली जाते. कंत्राटदाराकडून नळजोडणी झाल्यानंतर सदर ग्राहकांना देयके देण्याचे निर्देश आहेत. तरीपण नळजोडणी न करता पाण्याचे बिल देण्यात आले. त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई त्वरित केली जाईल.
- सुशील पाटील, उपविभागीय अभियंता मजीप्रा, बल्लारपूर