ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’

By राजेश भोजेकर | Published: April 7, 2023 11:07 AM2023-04-07T11:07:10+5:302023-04-07T11:07:34+5:30

देश-विदेशातील पर्यटक जंगल सफारी व व्याघ्र सफारीसाठी ताडोबात येत असतात.

'Birdman' who makes the sound of 200 animals and birds in Tadobat; His name is Sumedh Waghmare | ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’

ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’

googlenewsNext

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखिवत असल्याने ताडोबामध्ये त्याला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. सुमेध वाघमारे असे त्यांचे नाव आहे. या ‘बर्डमॅन’मुळे पर्यटकांना पशु व पक्ष्यांचा हुबेहुब पक्षांचा आवाज ऐकायला मिळत आहे.
हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देश-विदेशात जगप्रिसध्द आहे. देश-विदेशातील पर्यटक जंगल सफारी व व्याघ्र सफारीसाठी ताडोबात येत असतात.

ताडोबामध्ये वाघ, बिबट यासह पशु, पक्षीसुध्दा मोठ्या संख्येने आहेत. ताडोबात जवळपासस २०० हून अधिक पशू व पक्ष्यांची नोंद आहे. शहरी भागातील वाढते औद्योगिकरण, सिमेंटची घरे, प्रदुषण यामुळे पक्षी नाहीसे होत आहे. त्यामुळे लृप्त होत असलेल्या पक्ष्यांना बघणे त्यांचा आवाज ऐकणे हा एक सुखद क्षण आहे. ताडोबामध्ये कार्यरत असलेले  सुमेध वाघमारे हे तब्बल २०० पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात. चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबळी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा, हरीण, साबंर यासह २०० हून अधिक पशु व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देत आहे.

यामाध्यमातून ते पशू, पक्षी वाचविण्याचा संदेश सर्वदूर पोहोचवित आहे. २०० हून अधिक पशू पक्ष्यांचे आवाज काढत असल्याने वाघमारेला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. विशेष म्हणजे वाघमारे यांनी संघर्ष करित हे यश मिळविले आहे. आवाज काढण्याचे उपजत कलागुण असलेल्या वाघमारे यांनी परिस्थितीशी दोन हात करित कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला तर कधी अन्य काम करून पोट भरले.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात गॅट मॅनेजर पदाची परिक्षा देण्यासाठी वाघमारे चंद्रपुरात आले. त्यांच्या उपजत कलागुणांची दखल ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्यासह ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक नंदकुमार काळे, मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी घेतली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच वाघमारे ताडोबात दाखल झाले आहेत. ताडोबात आता ते वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढून पर्यटकांचे मनोरंजन करित आहेत. तसेच त्यांच्या आवाजाचे शो देखील ताडोबात आयोजित केले जात आहे. वाघमारे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत याच पध्दतीचे काम केले आहे. त्याच आवाजाच्या जादुची किमया आता ताडोबा प्रकल्पात दाखवून पर्यटकांचे मनोरंजन करित आहेत.

Web Title: 'Birdman' who makes the sound of 200 animals and birds in Tadobat; His name is Sumedh Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.