चिमूर तालुक्यात २८ पैकी १९ ग्रामपंचायतींवर भाजपचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:49+5:302021-02-11T04:30:49+5:30
चिचाळा शास्त्री ग्रामपंचायत सरपंचपदी अरविंद राऊत व उपसरपंच विनायक वासनिक, किटाडी तुकुम सरपंच रंजना ननावरे व उपसरपंच गजानन वाकडे, ...
चिचाळा शास्त्री ग्रामपंचायत सरपंचपदी अरविंद राऊत व उपसरपंच विनायक वासनिक, किटाडी तुकुम सरपंच रंजना ननावरे व उपसरपंच गजानन वाकडे, उसेगाव सरपंच प्रियंका पाटील व उपसरपंच निखिल चाफले, कळमगाव सरपंच सुमित्रा गोहणे व उपसरपंच कृष्णा कापसे, मासळ सरपंच विकास धारने व उपसरपंच प्रमोद खापर्डे, मानेमोहाळी सरपंच राजू करारे व उपसरपंच निखील जीवतोडे, वाघेडा सरपंच व स्वीटी ननावरे व उपसरपंच प्रवीण श्रीरामे, खैरी सरपंच वसंता नरुले व उपसरपंच प्रीती गजभे, भिवकुंड सरपंच चंद्रकला पाटील व उपसरपंच प्रशांत काठवते, शिरपूर सरपंच गुलाब निकोडे व उपसरपंच राजेंद्र भाणारकर,अडेगाव देश करिष्मा गजभे व उपसरपंच संजय चौधरी, कपरला सरपंच रंजना दडमल व उपसरपंच निर्मला सावसाकडे, कवठाळा सरपंच प्रवीण सावसाकडे व उपसरपंच रमेश काळे, केसलाबोडी सरपंच नानी चौखे व उपसरपंच कवडू चौखे, जामगाव कोमटी सरपंच प्रेमीला ठगे व उपसरपंच जगदीश बोबडे, मुरपार सरपंच जगदीश ननावरे व उपसरपंच भरत अथरगडे, जांभूळघाट सरपंच रंजना खेडेकर व उपसरपंच राजू साठोने, पांजरेपार सरपंच आयेशा बंगाले व उपसरपंच राहुल गुरपुडे तर चिंचोली उपसरपंच भाग्यश्री चौधरी विजयी झाले.
पहिल्या फेरीत १६ तर बुधवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत १९ अशा एकूण ३५ ग्रामपंचायतींवर भाजपने आमदार बंटी भांगडीया आघाडीने वर्चस्व प्राप्त केल्याचा दावा केला आहे. या निवडणुकीत भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, युवा नेते समीर राचलवार,
भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार, जिल्हा सचिव राजू देवतळे, जि.प. क्षेत्र प्रमुख विनोद चोखरे, प्रवीण गणोरकर, अविनाश बारोकर ,नितीन गभने संदीप पिसे प्रवीण गणोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.