महापौरांसह भाजपच्या शिष्टमंडळाची अन्नत्याग सत्याग्रहाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:29+5:302021-02-27T04:37:29+5:30

उपोषणाचा पाचवा दिवस आहे. साखळी उपोषणात नेत्रा इंगुलवार, जास्मीन शेख, भारती शिंदे, योजना धोत्रे, अंजली अडगुरवार यांनी सहभाग ...

BJP delegation along with the mayor visited Satyagraha | महापौरांसह भाजपच्या शिष्टमंडळाची अन्नत्याग सत्याग्रहाला भेट

महापौरांसह भाजपच्या शिष्टमंडळाची अन्नत्याग सत्याग्रहाला भेट

Next

उपोषणाचा पाचवा दिवस आहे. साखळी उपोषणात नेत्रा इंगुलवार, जास्मीन शेख, भारती शिंदे, योजना धोत्रे, अंजली अडगुरवार यांनी सहभाग घेतला. महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, माजी उपमहापौर संदीप आवारी यांनी भेट देऊन इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्याशी चर्चा केली.

दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. विदर्भ राज्य आघाडीचे नीरज खांदेवाले, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एल. आय. सरबेरे, सचिव डॉ. विजय भंडारी आणि कोषाध्यक्ष डॉ. अमित कोसुरकर, फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. विजय मोगरे, एमायडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्श दात्री समितीचे प्रतिनिधी दामोदर मंत्री, महर्षी विद्यामंदिरच्या प्राचार्य लक्ष्मी मूर्ती, संजीवन पर्यावरण संस्था मूलचे अध्यक्ष उमेशसिंग झिरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखेचे अध्यक्ष भरत गुप्ता, शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, जमाअत ए इस्लामी हिंद चंद्रपूरचे शहराध्यक्ष मुन्तजिर अहमद खान, एलिमेंट चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे पदाधिकारी एकता विकलांग शक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रदीप लांडगे, ग्राम विकास कृती समिती विसापूरचे योगेश निपुंगे, डॉ. प्रा. पदमरेखा दीक्षित, नवी मुंबईतील विवेक दीक्षित, शीव दिक्षित, मुकेश भांदककर, साई राम टॉवर्स असोसिएशन; चंद्रपूर श्रीराम वाॅर्डचे पदाधिकारी, गुड मॉर्निंग क्लब चंद्रपूरचे पदाधिकारी, मावळा सायकल ग्रुप चंद्रपूर यांचा समावेश होता.

Web Title: BJP delegation along with the mayor visited Satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.