रत्नापूर ग्रामपंचायतीवर भाजपचा वरचष्मा, ९ तर काँग्रेसला ६ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:48+5:302021-01-21T04:25:48+5:30
तीन प्रमुख पक्षांचे तालुका अध्यक्ष हे रत्नापुरात वास्तव्य करतात. यामुळे तालुक्याचे लक्ष रत्नापूर ग्रामपंचायतीकडे लागले होते. १५ सदस्य संख्या ...
तीन प्रमुख पक्षांचे तालुका अध्यक्ष हे रत्नापुरात वास्तव्य करतात. यामुळे तालुक्याचे लक्ष रत्नापूर ग्रामपंचायतीकडे लागले होते. १५ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीवर स्वतःच्याच गटाची सत्ता आणण्यासाठी सारेच प्रयत्न करीत होते. भाजप गटाला ९, तर काँग्रेस गटाला ६ जागांवर विजय मिळविता आला. भाजप गटाकडून अशोक गभणे, उषाताई धारणे, सुरेखा पर्वते, अरूण मडावी, सुनंदा मांदाळे, वामन झोडे, कविता सावसाकडे, हेमलता सोनटक्के, मायाताई लोधे आणि काँग्रेस गटाकडून इमरान पठाण, मंगेश मेश्राम, वासुदेव दडमल, रजनी काऊलकर, प्रवीण कामडी, नजरी मेश्राम यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपकडून सासू उषाताई धारणे, तर काँग्रेसकडून जावई वासुदेव दडमल विजयी झाले.