शिबिराद्वारे भाजपाने सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत केली
By admin | Published: May 9, 2017 12:41 AM2017-05-09T00:41:16+5:302017-05-09T00:41:16+5:30
भारतीय जनता पक्ष भद्रावती तालुक्याच्या वतीने मुर्लीधरपाटील गुंडावार सभागृहात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हंसराज अहीर: भद्रावतीत नेत्र तपासणी शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती: भारतीय जनता पक्ष भद्रावती तालुक्याच्या वतीने मुर्लीधरपाटील गुंडावार सभागृहात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जवळपास दोन हजार नागरिकांची नेत्रतपासणीसाठी नोंदणी करण्यात आली तसेच १६५० मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय देवतळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय राऊत, राहुल सराफ, डॉ. अनिल बुजोणे, चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, पं.स. सभापती विद्या कांबळे, उपसभापती नागो बहादे, अफजल किशोर गोवारदिपे, सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे व जि.प. सदस्य यशवंत वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक बांधीलकी जोपासत मोतीबिंदू तसेच डोळ्याच्या आजाराने ग्रस्त गोरगरीब रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व चष्मे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भाजपाकडे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उद्घाटनीय भाषणातून म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन माधव बांगडे आभार राजेश भलमे यांनी मानले.