भाजप सरकार सदैव आदिवासींच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:44 PM2019-01-04T22:44:58+5:302019-01-04T22:45:29+5:30
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असेपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावतीतर्फे स्थानिक श्री मंगल कार्यालयात पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा तथा गोंडी रेकार्डिंग समूह नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : केंद्रात व राज्यात भाजप सरकार असेपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावतीतर्फे स्थानिक श्री मंगल कार्यालयात पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा तथा गोंडी रेकार्डिंग समूह नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला आदिवासी नेते रमेश मेश्राम, दिनेश मडावी, गोलू गेडाम, महादेव सिडाम आदी उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेत १२ तर गोंडी रेकार्डिंग समूह नृत्य स्पर्धेत २० चमू सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जय जंगो महिला पुरुष मंडळ कोरपना, द्वितीय जय गोंडवाना ढेमसा मंडळ सावरहिरा, तृतीय आदिवासी परदान ढेमसा मंडळ आसिफाबाद यांनी पटकाविला. गोंडी रिकार्डिंग समूह नृत्य स्पर्धेत प्रथम राणी दुर्गावती डान्स गृप लोहारा, द्वितीय जय सेवा डान्स गृप रामटेक तर तृतीय जय सेवा डान्स गृप भद्रावती यांनी पटकाविला.
समाजातील पारंपारिक नृत्य नव्या पिढीला कळावे, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे आदिवासी युवा नेते रमेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महादेव सिडाम तर उपस्थितांचे आभार विनोद शेडमाके यांनी मानले. यावेळी संदीप नैताम, पिंटू मरस्कोल्हे, संदीप कुमरे, रंजीत आत्राम, विनोद कुमरे, पिंटू मडावी, गंगाधर मेश्राम, जगदिश पेंदाम, भास्कर वरखडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.