भाजपा सरकार कोल इंडियाला संपविण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 03:30 PM2020-06-05T15:30:53+5:302020-06-05T15:32:02+5:30
७ हजार मिलीयन टन कोळसा ब्लॉक खासगी व्यक्तींना देऊन कोल इंडियाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप राजुरा येथे पत्रकार परिषदेत अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री सुधीर घरडे यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय जनपा पार्टीचे सरकार कोल इंडियाला संपविण्याच्या तयारी असून ७ हजार मिलीयन टन कोळसा ब्लॉक खासगी व्यक्तींना देऊन कोल इंडियाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप राजुरा येथे पत्रकार परिषदेत अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री सुधीर घरडे यांनी केला.
११ जून २०२० ला देशातील ५० कोल ब्लॉक लिलाव करण्याचा भारत सरकारच्या निर्णय असून या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय खदान मजदूर संघाच्या वतीने देशातील सर्व मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे १० जून २०२० ला सकाळी १० पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हजारो मजदूर धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व संघटनांनी सहभागी व्हावे, याकरिता विनंती करण्यात आली असल्याचे महामंत्री घरडे यांनी सांगितले.
कोळसा उद्योग खाजगीकरण केल्यामुळे कोल इंडियाला या पूढे कोळसा ब्लॉक मिळणार नाही. त्यामुळे कोल इंडियामध्ये कार्यरत हजारो कर्मचारी रोजगारापासून वंचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपा सरकार कोल इंडियाला संपविण्याचे कट कारस्थान करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रसंगी अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री जोगेंद्र यादव, संगटन मंत्री विवेक अल्लेवार, उपाध्यक्ष शांताराम वांढरे उपस्थित होते.