भाजपने पाळला आणीबाणीविरुद्ध काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:46+5:302021-06-26T04:20:46+5:30
चंद्रपूर : २५ जून १९७५ मध्ये तत्कालीन माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून लोकांचे स्वातंत्र्य ...
चंद्रपूर : २५ जून १९७५ मध्ये तत्कालीन माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते, असा आरोप करून भाजपने शुक्रवारी काळा दिवस पाळला.
देशात लागू केलेल्या आणीबाणीविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबले. त्यामुळे भाजपकडून दरवर्षी हा दिवस देशभरात सर्वत्र काळा दिवस म्हणून पाळला जातो, अशी माहिती माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री दिली. आणीबाणीच्या विरोधात लढ देणाऱ्या सत्याग्रही म्हणून शिक्षा भोगलेल्या भाजपच्या नेत्या व माजी राज्यमंत्री शोभाताई फडणवीस यांच्या निवासस्थानी मूल येथे स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला. याशिवाय मिसांबदी बंडू पद्मलमवार, गिरीश अणे यांचाही सन्मान केला. यावेळी खुशाल बोंडे, राजू घरोटे, पं. स. सभापती चंदू मारगोनवर, प्रशांत समर्थ, महेंद्र खरकाडे, प्रशांत लाडवे, प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे, संतोष ठाकूरवार, प्रकाश चामटपल्लीवार, राकेश समर्थ, प्रवीण मोहुर्ले, बबन गुंडावार, प्रमोद तोकुलवार आदी उपस्थित होते.